in

“कुठेही गेलं तरी, जनतेचं म्हणणं ऐकून घ्यायचं असतं” भास्कर जाधवांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूण आणि खेडमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या मंत्र्यांच्या चमूमध्ये आमदार भास्कर जाधव देखील होते. जाधव यांनी गाऱ्हाण मांडणाऱ्या एका महिलेसोबत अरेरावी केली. त्यावर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वक्यव्य केलं आहे.

“आम्ही कुठेही गेलो तर जनता काही सांगत असते. त्यावेळेस त्यांचं ऐकायचं असतं. तिथली परिस्थिती नेमकी काय झालेली आहे. हे मला माहिती नाही. मी पण भास्कर जाधव यांना ओळखतो. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलंय. आम्ही एकत्र मंत्रिमंडळात होतो. त्यांनी असंही स्टेटमेंट केलं आहे की, ते त्यांच्या घरातील नातेवाईक होते.
लोकप्रतिनिधी खासदार, आमदार आणि मुख्यमंत्री कुठेही गेले तर जनतेचं म्हणणं ऐकून घेणं आमचं कर्तव्य आहे. ते पार पाडलं पाहीजे.”, असं अजित पवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल-डिझेलवरील कराचा सदुपयोग पायाभूत सुविधांसाठीच – केंद्र सरकार

Tokyo Olympic | सिल्व्हर मेडल घेऊन मिराबाई चानू मायदेशात