in

अखिलेश यादव यांचा ममता दीदींना शुभेच्छा देत भाजपावर निशाणा

पश्चिम बंगालमधल्या निवडणुकांच्या निकालाचे चित्र हळूहळू स्पष्ट होत चालले आहे. यामध्ये ममता दीदींच आघाडीवर असल्याने आता त्या विजयाची हॅट्ट्रीक साधतील असे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता या सर्व घडामोडीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत आहेत.

समाजवादी पार्टीचे नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. ट्विटरवरून त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवत भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.‘पश्चिम बंगालमध्ये भाजपा द्वेषाचं राजकारण पराभूत करणारी जागरूक जनता, आक्रमकपणे लढा देण्याऱ्या ममता बॅनर्जी आणि टीएमसीच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना शुभेच्छा’ असं ट्विट त्यांनी केलं आहे.

ट्विटमध्ये त्यांनी ममता दीदींवर आक्षेपार्ह केलेल्या टीकेचाही समाचार घेतला आहे. ‘भाजपानं एक महिलेवर खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचं जनतेनं दिलेलं उत्तर आहे. ‘दीदी ओ दीदी’ ला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.’, असंही त्यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

आता हाती आलेल्या निकालाचा कल पाहता तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये सहजपणे सत्तास्थापन करेल, असे दिसत आहे. तर भाजप 100 जागांचा टप्पाही ओलांडेल की नाही, याबाबत शंका आहे. अद्याप निकाल पूर्णपणे स्पष्ट होण्यासाठी संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल. मात्र, तुर्तास तरी ममता बॅनर्जी यांनी भाजपचे आक्रमण थोपवून पश्चिम बंगालचा गड राखला, असेच म्हणावे लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार यांनी केले ममता बॅनर्जींचं अभिनंदन

Pandharpur Election Result Live| पंढरपुरात भाजपचे समाधान आवताडे आघाडीवर