in

काँग्रेस संपवण्यासाठी सर्व एकत्र आले; बाळासाहेब थोरातांचा खळबळजनक आरोप

सूरज दहाट, अमरावती | अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणूकीत महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी खळबळजनक वक्तव्य केलं, जिल्हा बँकेच्या निवडणूकीतुन काँग्रेस पक्षावर हल्ला करण्यात आला व काँग्रेस संपवण्यासाठी सर्व एकत्र झाले होते असा खळबळ जनक आरोप केला. त्यांचा रोख राष्ट्रवादी, शिवसेना व राज्यमंत्री बच्चू कडु यांच्यावर होता.

अमरावती जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची निवडणूकीत महाविकास आघाडी सरकारचे यशोमती ठाकूर व बच्चू कडु हे दोन मंत्री एकमेकांविरोधात होते, तर ही निवडणूक भ्रष्टाचार व ईडीच्या नोटिसवरून राज्यात गाजली होती.

अमरावतीच्या विश्राम गृह येथे जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी महसूल मंत्री व काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी खळबळजनक वक्तव्य केलं. जिल्हा बँकेच्या निवडणूकीतुन काँग्रेस पक्षावर हल्ला करण्यात आला व काँग्रेस संपवण्यासाठी सर्व एकत्र झाले होते असा खळबळ जनक आरोप मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला त्यांचा रोख राष्ट्रवादी, शिवसेना व राज्यमंत्री बच्चू कडु यांच्यावर होता. पण तरीही काँग्रेसने याठिकाणी मोठं यश मिळवलं असही बाळासाहेब थोरात म्हणाले.

What do you think?

-3 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“बिचाऱ्या मुलांवर दया करा” राखी सावंतचं वक्तव्य

लखीमपूर खेरी प्रकरण; आरोपी आशिष मिश्राला डेंग्यूची लागण