in

सीमाप्रश्नी सर्व पक्षांनी एकत्र यावे – शरद पवार

भारत आणि चीन दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव वाढत असताना दिसत आहे. चीनसोबत युद्ध झाल्यास भारताला पराभवाचे तोंड पाहावे लागेल असे चीनने म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्यासाठी भारत चीन दरम्यान सुरू असलेली चर्चेच्या १३ व्या फेरीतही काहीच निष्पन्न झाले नाही, दरम्यान याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद यांनी सीमाप्रश्नी सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली आहे.

मागच्या काही दिवसांत लखीमपुरची घटना घडली. ती घटना सुदैवाने मीडियामुळं बाहेर आली. यामध्ये शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली यामध्ये एक पत्रकार देखील त्यामध्ये होता. असा प्रकार या आधी असं कधी झालं नव्हतं. त्यामध्ये एक बाब समोर आली की केंद्रीय गृह राज्यमंत्री यांचे चिरंजीव त्यामध्ये होते. जवळपास 6 दिवसांनंतर सुप्रीम कोर्टाने यावर भाष्य केले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे तोपर्यंत हा व्यक्ती त्यामध्ये नव्हता असं त्यांच्या पक्षांकडून सांगण्यात येत होतं. जरी त्यांचा व्यक्ती असला तरी त्यांनी लगेचच कारवाई करण्यात यायला हवी. या घटनेची जबाबदारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी आपली जबाबदारी टाळता येणार नाही त्यामुळे त्यांनी तत्काळ पदावरून मुक्त व्हावं, असं ते म्हणाले.

मावळ घटनेसंदर्भात होत असलेल्या आरोपांवरुन पवार म्हणाले की, मावळमध्ये काय झालं असा आरोप भाजपने केला. त्यांना सांगायचं आहे. त्यावेळी शेतकरी मृत्यूमुखी पडले त्याला जबाबदार राजकीय पक्ष किंवा नेते नव्हते. त्यावेळी आरोप पोलिसांवर होते. माजी गृहमंत्री यांनी-लखीमपूर घटनेशी तुलना केली. परंतु हे लक्षात घ्यावं की मावळ घटनेवरून लोकांना हे माहीत झालं की या घटनेला सरकार जबाबदार नव्हतं तर स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे हे स्पष्ट झालं आहे, असं ते म्हणाले. मावळच्या घटनेबाबत ज्यावेळी लोकांना कळलं त्यानंतर हे स्पष्ट झालं की सरकार याला जबाबदार नव्हतं. त्यामुळेच मावळमध्ये राष्ट्रवादीचे आमदार 90 हजार मतांनी निवडून आले आहेत, असं शरद पवार म्हणाले.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पुणे आणि पिंपरी चिंचवडला महापौर आमचाचं असेल’, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य

नंदुरबारमध्ये लघुचित्रपट दाखवून लसीकरणाबाबत जनजागृती