in

रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे महिलेचे दागिने वाचले

रेल्वे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे महिला प्रवाशाचे लोकल मध्ये विसरलेले अडीच लाखांचे दागिने परत मिळाले आहेत. ही महिला सीएसटी ते डोंबिवली असा रेल्वे प्रवास करत होती. तिच्या जवळ असलेल्या बॅगेत अडीच लाखांचा ऐवज होता.

डोंबिवली रेल्वे स्थानकावर सदर महिला उतरली. मात्र तिची बॅग मात्र लोकलमध्येच राहिली. काही वेळाने बॅग विसरल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तत्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. रेल्वे पोलिसांनी पुढील स्टेशनची यंत्रणा कामाला लावत शोध सुरू केला.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावर सदर लोकल पोचताच पोलिसांनी तत्काळ लोकल मध्ये शोधाशोध केली. यावेळी त्यांना सी एस. एम टी.बाजूच्या लेडीज डब्याचे पुढील जनरल डब्यात एक प्लास्टिक बॅग आढळून आली. पोलिसांनी बॅग ताब्यात घेत या महिलेला संपर्क केला. त्यानंतर ओळख पटवून पोलिसांनी बॅग तिच्या स्वाधीन केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशकात लवकरच शाळेची घंटा वाजणार, छगन भुजबळांनी सांगितली तारीख

भारतात आतापर्यंत ४० कोटी लोकांना लस, केंद्राने जारी केली आकडेवारी