in

अमेरिकन टेनिसपटूला कोरोनाची लागण

अमेरिकन स्टार महिला टेनिसपटू कोको गॉफला कोरोनाची लागण झाली आहे. कोकोने रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच ती ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही.

महिला टेनिस क्रमवारीत कोको २५व्या स्थानावर आहे. १७ वर्षीय कोकोने फ्रेंच ओपनची उपांत्यपूर्व फेरी आणि विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या १२ सदस्यीय टेनिस संघाचे नेतृत्व कोको करणार होती. कोकोने काल रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला कोरोना झाल्याचे आणि ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याविषयी सांगितले.

कोकोने लिहिले, “मी करोना पॉझिटिव्ह आढळली आहे आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. यामुळे मी फार निराश झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे आणि मला आशा आहे की भविष्यात हे वास्तव घडवून आणण्यासाठी माझ्याकडे आणखी बर्‍याच संधी असतील.”“मला माझ्या संघाला आणि प्रत्येक ऑलिम्पियनला शुभेच्छा द्यायच्या आहेत.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

LGBT | मला लोकांची पर्वा नाही’ 87 वर्षांच्या आजीनं अभिमानानं स्वीकारलं ट्रान्सजेंडर नातीला

“कपिल शर्मा शो ” पुन्हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला