in

“मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय महोत्सवात झळकण्यासाठी पुढाकार घेणार”- अमित देशमुख

मराठी चित्रपट जागतिक स्तरावर नावाजला जावा आणि मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उत्कृष्ट मराठी चित्रपट येणाऱ्या काळात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी सांस्कृतिक विकास,महामंडळ मर्यादितच्या संचालक महामंडळाची १५७ व्या बैठकीत ते बोलत होते.

कान्स २०२१ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कडूगोड आणि मी वसंतराव या दोन चित्रपटांची निवड समिती सदस्यांनी केली.आज झालेल्या बैठकीत या दोन्ही चित्रपटांच्या निवड प्रक्रीयेबद्दल संस्थेचे निर्माते,दिग्दर्शक कलाकार यांचे बैठकीत सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांच्यासह उपस्थित अधिकार्यांनी अभिनंदन केले. यावेळी देशमुख म्हणाले “मराठी चित्रपट जागतिक स्तरावर नावाजला जावा, आणि मराठी चित्रपटांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी उत्कृष्ट मराठी चित्रपट येणाऱ्या काळात वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सामील करण्यात येणार आहेत, यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष सहभाग घेणे शक्य झाले नव्हते, मात्र आगामी काळात नोव्हेंबर २0२१ मध्ये गोव्यात होणाऱ्या 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या फिल्मबझार अंतर्गत सर्वोत्तम १० मराठी चित्रपट पाठवण्यात येणार आहेत”. येत्या सप्टेंबर ते नोव्हेंबर २०२१ काळात आयोजित करण्यात येणाऱ्या बर्लिन, व्हेनिस, न्युयॅार्क मराठी सिनेमा झळकण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंञी अमित देशमुख यांनी सांगितले.

यावेळी फिल्मसिटी परिसरातील शुटींगस्थळे यांचे भाडेतत्वावर आरक्षण देणे, मेकअप रूम साहित्यानुसार प्रोडक्शन ला उपलब्ध करून देणे, महामंडळस्तरावर महामंडळाच्या सामाजिक योजना राबविणे, वित्तीय वर्ष २०२०-२१ चे वार्षिक लेखे व संचालक मंडळाचा अहवाल मंजूर करणे, अशा मुद्दयांवरही चर्चा यावेळी करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रस्ता खचला अन…

पहाटे २.१५ वाजता विठ्ठलाची महापूजा, मुख्यमंत्री पंढरीत दाखल