in

‘या’ शहरात 51 इमारती अतिधोकादायक

अमरावती महानगरपालिका हद्दीतील तब्बल 51 इमारती अतिधोकादायक असून त्या पावसाळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनपाने या शिकस्त झालेल्या मालमत्ता धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. तर या इमारतीत 250 लोक राहत असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

पावसाळ्यात अनेक इमारती कोसळतात त्यात लोकांचा जीव जातो,त्यामुळे धोकादायक व शिकस्त इमारती कोसळल्यास जिवितहानी होऊ नये,त्यामुळे तातडीने या इमारती खाली करा अश्या नोटिसा मनपा प्रशासनाने या मालमत्ता धारकांना दिल्या आहेत,मात्र या शिकस्त झालेल्या इमारती तात्काळ खाली करणे आवश्यक आहे नाही तर या कोसळल्या तर जिवीतहानी होऊ शकते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपा नेत्याच्या मुलीची निर्घृण हत्या

‘ओळखपत्र नसलेल्यांचे लसीकरण कसे करणार?’