कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभर विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाऊन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमचे आभार. सतत नवनव्या संघर्षांना सामोरे जाणाऱ्या छोट्या दुकानदारांबद्दल मला नेहमी वाईट वाटत राहते. आता करोना नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे जेणेकरून ही बंधने लवकरात लवकर हटवली जातील. हे ट्विट करताना आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे.
परंतु यापूर्वी आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करत लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. या ट्विटमध्ये त्यांनी लॉकडाऊनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले होते की, ‘उद्धवजी, या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान गरीब, स्थलांतरित मजूर आणि छोट्या उद्योजकांचे होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हे हॉस्पिटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत मृतांचे प्रमाण कमी करण्यावर भर देऊयात.’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउन नको असल्यास आरोग्य सुविधा वाढवा उद्योजकांनी पुढाकार घ्यावा या शब्दात आनंद महिंद्रा यांना टोला लगावला होता.
Comments
Loading…