in

Anil Deshmukh | अनिल देशमुख यांची आज CBI चौकशी; आज होणार निर्णय?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांसंदर्भात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) चौकशी करणार आहे. दोन दिवसांपूर्वी CBI ने अनिल देशमुख यांना समन्स बजावला होता. दरम्यान, या प्रकरणात आतापर्यंत अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सीबीआयने कसून चौकशी केली होती.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांनी निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझेला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याच्या केलेल्या आरोपाबाबत १५ दिवसांमध्ये प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यापासून याप्रकरणी चाैकशी केली जात आहे.

तथापि, या प्रकरणात परमबीर सिंग आणि समाज सुधारक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांची देखील CBI ने चौकशी केली होती. परमबीर सिंग आणि संजय पाटील यांच्याकडून घेतलेल्या माहितीवरुन सीबीआयचे अधिकारी आज अनिल देशमुख यांना प्रश्न विचारतील. या सगळ्यावर अनिल देशमुख काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona | देशभरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; तब्बल 1,027 कोरोना रूग्णांचा मृत्यू

coronavirus: देशात पुन्हा लागणार लॉकडाऊन?