in

Anil Deshmukh | अनिल देशमुखांची सीबीआयकडून साडेआठ तास चौकशी ; ‘या’ प्रश्नांची सरबत्ती ?

पोलीस अधिकारी सचिन वाझे खंडणीप्रकरणी अखेर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज सीबीआयकडून चौकशी करण्यात आली. तब्बल साडेआठ तास ही चौकशी सुरु होती. त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. या चौकशीत या प्रकरणाशी संबधित त्यांना असंख्य प्रश्न विचारण्यात आले आहेत.

सीबीआयने समन्स बजावल्यानंतर अनिल देशमुख आज सकाळी 10 वाजता सीबीआयच्या सांताक्रुझ कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. तब्बल साडे आठ तास ही चौकशी चालली. या चौकशीत देशमुख यांच्यावर प्रश्नांच्या फैरी झाडण्यात आल्या.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दरमहा १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप खरा आहे का ? सचिन वाझे यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिले होते का ? यासह इतर अनेक प्रश्न देशमुख यांना विचारण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे.

दरम्यान, सीबीआयला या प्रकरणाचा तपास करून 15 दिवसात कोर्टाला अहवाल सादर करायचा आहे. सीबीआय कोर्टाला अहवाल सादर करणार की कोर्टाकडून आणखी अवधी वाढवून मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

#BreakTheChain | हीच ती वेळ… महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू

Maharashtra Lockdown | मुख्यमंत्र्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपली… कठोर कारवाईचे आदेश