in

SACHIN VAZE ISSUE : कारवाईपासून स्वत:ला वाचविण्यासाठी खोटा आरोप, गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्पष्टीकरण

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकडे दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा दावा पोलीस महासंचालक (होमगार्ड) परमबीर सिंह यांनी केला आहे. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा दावा फेटाळला आहे.


पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी परमबीर सिंह यांनी हा खोटा आरोप केला आहे, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी दिले आहे. मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता असल्याने स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी हा आरोप केला आहे, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एका स्त्रीच्या पराभवासाठी संपूर्ण सत्तेचा वापर, पश्चिम बंगालवरून शिवेसनेची भाजपावर टीका

परमबीर सिंह यांच्या आरोपावरून भाजपा आक्रमक, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी