गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.
या आशयाचं पत्र ट्वीट
प्रति,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
आदरणीय महोदय,
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडेअॅड.जयश्री पाटील यांच्याद्वारे दाखल याचिकेमध्ये आज दिनांक 05 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सी.बी.आय मार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्या अनुषंगाने मी मंत्री (गृह) या पदावर राहणे मला नैतिकदृष्ट्य योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत :हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब, मला मंत्री (गृह) या पदावरुन कार्यमुक्त करावे, ही नम्र विनंती, आपला अनिल देशमुख
Comments
Loading…