माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत असून, भाजपसह अन्य पक्षांनी ठाकरे सरकारवर चौफेर टीकास्त्र सोडले. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर अजून सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक ट्विट भाजप नेत्याने केले आहे.
भाजपचे नेते म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी एकामागून एक अनेक ट्विट्स करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. या सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून आता हा पापांचा घडा भरत चालला आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा ही तर फक्त सुरूवात आहे, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
निगरगट्ठ ठाकरे सरकारने त्यांची पाठराखण केल्याने अनिल देशमुखांना अभय मिळाले होते. अनिल देशमुख यांचा राजीनामा हा प्रचंड नाचक्की झाल्यानंतरचा आणि कोर्टाच्या निर्देशानंतरचा आहे. यामुळे राज्य सरकारच्या गैरकारभाराचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. मात्र, जे काही समोर आलेय ते फक्त हिमनगाच्या टोकाप्रमाणे आहे. अजून बरेच काही समोर येणार आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी ट्विटरवरून केली.
Comments
Loading…