in

किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार- अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेना नेते अनिल परब यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. 72 तासांत माफी न मागितल्यास दावा ठोकणार असल्याचा इशारा परब यांनी दिला आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावर अवैधरित्या रिसॉर्ट बांधल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आता अनिल परब यांनी सोमय्यांनी लेखी माफी मागण्याची मागणी केली आहे, यासाठी 72 तासांचा अवधीही देण्यात आला आहे. 72 तासांत माफिनामा न आल्यास 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत परब यांच्याबाबत एक तक्रार केलीय. ही तक्रार परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत आहे. हा रिसॉर्ट परब यांनी काळ्या पैशातून बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केलाय. फक्त जावडेकरच नाही तर सोमय्या यांनी याबाबत ED, CBI, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडेही तक्रार केलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीलंकेच्या ‘या’ दिग्गज गोलंदाजाने घेतली निवृत्ती

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; 6 संशयित ताब्यात