in

अन्नू मलिक यांना मातृशोक…

गेल्या अनेक दिवसांपासून हिंदी चित्रपट सृष्टीमधून सतत दु:खद घटना समोर येत आहेत. नुकतेच ७ जुलै ला जेष्ठ अभिनेत्री सुरेख सिकरी याचं निधन झालं. त्यातच आता गायक,संगीतकार अन्नू मलिक यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आईचे दु:खद निधन झाले आहे. अन्नू मलिक यांचा मुलगा गायक अरमान मलिकने सोशल मीडियावरून ही माहिती दिली.

अरमान मलिकने सोशल मीडियावर आपल्या आजीच्या आठवणींना उजाळा दिला. एक व्हीडिओ शेअर करत त्याने आठवणी जाग्या केल्या व्हीडिओमध्ये अरमान त्याच्या आजीसोबत गप्पा मारताना दिसतोय. अरमान ने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात अरमानची आज्जी दवाखान्यात उपचार सुरू घेत असताना अरमान त्यांच्या सोबत असल्याचे दिसून येते.

पोस्ट शेअर करत अरमान असं म्हणतोय कि, ” आज मी माझ्या आयुष्यातला सर्वात जवळचा मित्र गमवला, ती म्हणजे माझी आज्जी! माझ्या आयुष्यातला प्रकाश मी गमावला आहे.मी हे नुकसान कधीच भरून काढू शकत नाही, आजी माझ्या आयुष्यातली खूप प्रेमळ आणि मौल्यवान व्यक्ती होती. मी खूप आभारी आहे की तुझ्यासोबत वेळ घालावायला मिळाला. आता देव तुझ्या सोबत आहे”. अशी त्याने एक भावनिक पोस्ट आजीसोबतच्या फोटो सोबत शेअर केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रस्ते – पुलांच्या नुकसानीची पाहणी करा; अशोक चव्हाणांचे अधिकाऱ्यांना आदेश

राज कुंद्राचे धागेदोरे उत्तर प्रदेशपर्यंत