in

अफगाणिस्तानच्या कंदाहारमध्ये पुन्हा मशिदीत बॉम्बस्फोट

अफगाणिस्तानच्या कंधार येथे शुक्रवारी पुन्हा शिया मशीदीला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. शुक्रवारच्या नमाजच्या वेळी गर्दी असताना झालेल्या या स्फोटात किमान 32 जणांचा मृत्यू झाला. तसेच 50 हून अधिक लोक जखमी आहेत.

शिया बहुल परिसरात शुक्रवारच्या नमाजच्या वेळी झालेला हा सलग दुसरा बॉम्बस्फोट आहे.पाकिस्तानी मीडियाने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जारी केला आहे. गेल्या आठवड्यातील स्फोटात 100 जणांचा बळी, अफगाणिस्तानात गेल्या शुक्रवारी कुंडूज शहरात अशाच प्रकारचा बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. त्यातही शिया बहुल परिसरात शुक्रवारच्या वेळी लोक नमाज अदा करताना स्फोट घडला होता. यात 100 जणांचा जीव गेला होता. तसेच शेकडो जखमी झाले होते. बॉम्बस्फोट घडला त्यावेळी मशीदीत 300 पेक्षा अधिक लोक होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IPL 2021 Final | आयपीएलच्य़ा 14 व्या पर्वावर चेन्नईने कोरले नाव

कसारा घाटात चालत्या ट्रकने घेतला पेट