अँटिलियाजवळ जिलेटिन कांड्यांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला होता. याच ठिकाणी आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास पोलिसांना आणखी एक मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर निश्चित कारण समोर येईल.
मृताचे नाव सलीम अब्दुल शेख (वय 48) आहे. ते मजूर असून मुंब्रा रेतीबंदर येथील रहिवासी आहेत. मनसुख हिरेन मृ्त्यू प्रकरणाशी या घटनेचा काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.
Comments
Loading…