in

अँटिलिया स्फोटक प्रकरण; फॉरन्सिक टीमकडून सचिन वाझेंना घेऊन घटनेचे नाट्यरुपांतर

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानी सापडलेल्या स्फोटकाने भरलेल्या गाडी प्रकरणात आज मध्यरात्री फॉरन्सिक टीमने सचिन वाझे यांना घटनास्थळी आणून घटनेचे पुन्हा नाट्यरुपांतर केले. या घटने संदर्भात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधली संशयित व्यक्तीच्या हालचालीप्रमाणे सचिन वाझे यांना घटनास्थळावर चालण्यास लावले. त्यामुळे एकंदरीत घटनास्थळी घडलेल्या घटनेसारखेच नाट्यरुपांतर करण्यात आले.

फॉरन्सिक टीम शुक्रवारी मध्यरात्री 11 वाजताच्या दरम्यान सचिन वाझे यांना घेऊन अँटिलिया निवासस्थानी दाखल झाली होती. घटनेची पुनरावृत्ती करण्यासाठी एटीएस पथकाने अँटिलिया निवासस्थानी सचिन वाझे यांना आणण्यात आले. यावेळी फॉरन्सिक टीमकडून सचिन वाझे यांना सर्वप्रथम सध्या कपड्यामध्ये तीनदा चालायला लावण्यात आले. त्यानंतर दुसऱ्यांदा वाझे यांना लांब पांढरा सदरा घालायला लावला. तसेच डोक्यावर रुमालही लावायला लावला. यानंतर सचिन वाझे यांना पुन्हा त्या घटनास्थळावरील रस्त्यावर चालायला लावले. या दरम्यान वाझे यांच्या संपूर्ण पावलोन पावली व्हिडीओ रेकॉर्डींग करण्यात आले. या घटना प्रकरणात आढळलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधली संशयित व्यक्तीप्रमाणे वाझे यांचे फॉरन्सिक टीमकडून घटनेचे नाट्य रुपांतर करण्यात आले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

whatsapp, instagram डाऊन, नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त

Maharashtra Rains | राज्यातील ‘या’ भागात आणखी दोन दिवस पावसाची शक्यता