in

Apple कंपनीला जोरदार झटका; भरावा लागणार ‘एवढ्या’ कोटींचा दंड

बहुचर्चित Apple कंपनीला ब्राझील ग्राहक संरक्षण एजन्सी प्रोकॉन- एसपीने 2 दशलक्ष (मिलियन) डॉलर म्हणजेच 14 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. Apple कंपनीने आयफोन 12 च्या बॉक्ससोबत चार्जर न दिल्याने कंपनीला आता इतका मोठा दंड भरावा लागणार आहे. एका अहवालानुसार अ‍ॅपलला गेल्या वर्षीही या प्रकरणात प्रश्न विचारण्यात आला होता. प्रोकॉन-एसपीने याबाबत म्हटले आहे की, अ‍ॅपलने हा निर्णय घेताना पर्यावरणाचा फायदा होणार आहे, असं म्हटलं आहे. परंतु त्यांच्या या निर्णयामुळे पर्यावरणाचा फायदा होतोय, हे सिद्ध होऊ शकलं नाही.

गेल्या वर्षी Apple ने आयफोन 12 लाँच केला होता. कंपनीने म्हटले होते की, नवीन मॉडेल चार्जरसह येणार नाही, तसेच बॉक्समध्ये तुम्हाला इयरबड्सही मिळणार नाहीत. Apple ने म्हटले होते की, यामागील प्रमुख कारण म्हणजे आम्हाला कचऱ्याच्या समस्येपासून पर्यावरण वाचवायचे आहे, कंपनीने अशा प्रकारचे पाऊल उचलल्यानंतर सॅमसंग आणि अन्य स्मार्टफोन ब्रँडनेही स्मार्टफोनच्या बॉक्समधून चार्जर वगळण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रोकॉन- एसपी एजन्सीने आपल्या नवीन निर्णयात अ‍ॅपलला विचारले की, बॉक्समधून चार्जर काढून टाकल्यानंतर कंपनीने फोनची किंमत कमी केली का? अ‍ॅपलने अद्याप यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. चार्जरशिवाय अ‍ॅपल आयफोन 12 ची किंमत किती आहे आणि चार्जरसह किती आहे? याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती सादर केलेली नाही.

चार्जर व्यतिरिक्त अ‍ॅपलला असा सवाल केला की, युचर्सनी आयओएस अपडेट केले ज्यानंतर त्यांच्या फोनमध्ये अडचणी येऊ लागल्या आहेत. अ‍ॅपलनेही यात वापरकर्त्यांची कोणतीही मदत केली नाही. अ‍ॅपलला हे माहीत असायला हवे की ब्राझीलमध्ये ग्राहक संरक्षणविषयक कठोर नियम आहेत. अशा परिस्थितीत कंपनीला त्यांचा आदर करावा लागेल, असे प्रोकॉन- एसपीचे कार्यकारी संचालक फर्नांडो कॅपेज यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांनी केली सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह 50 कार्यकर्त्यांवर गुन्हा