in ,

अरुणाचलच्या तवांग भागातही भारत – चीन आमने-सामने

भारत आणि चीन दरम्यान लेहमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या तणावादरम्यान भारताच्या पूर्वेकडे अरुणाचल प्रदेशात भारत आणि चिनी सैनिक वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (LAC) समोरासमोर उभे ठाकले. कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेनंतर हा तणाव निवळल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ही घटना गेल्या आठवड्यात घडलीय.

भारत आणि चीनचे सैनिक पेट्रोलिंग दरम्यान एकमेकांना जवळपास भिडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणाचल प्रदेशात यांगत्सेजवळ तवांग सेक्टरमध्ये गेल्या आठवड्यात भारतीय सैनिकांनी चीनच्या जवळपास २०० सैनिकांना रोखलं आहे.

भारत चीनची वास्तविक नियंत्रण रेषा

संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भारत – चीन सीमेवर औपचारिकरित्या सीमा निश्चित करण्यात आलेली नाही. दोन्ही देशांची सीमा रेषा वैयक्तिक आकलनावर आधारीत आहे आणि दोन्ही देशांच्या आकलनात फरक आहे. त्यामुळे या भागात वारंवार अशा घटना घडून येऊ शकतात. दोन्ही देश आपआपल्या धारणेनुसार सीमेवर टेहळणी करतात. दोन्ही देशांदरम्यान कोणत्याही प्रकारची असहमती दिसली तर ‘प्रोटोकॉल’नुसार त्यावर शांतिपूर्ण मार्गानं चर्चेतून उत्तर काढलं जातं. गेल्या आठवड्यात ही घटना घडली असली तर सीमेवर शांती कायम असल्याचंही संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी म्हटल आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold-Silver: सणाच्या दिवसात पण सोन्याचांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, त्यांचे काम चालू आहे, ते गेल्यानंतर…; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया