in

Aryan Khan | राजकीय नेत्यांनी चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी-उज्वल निकम

संजय देसाई, सांगली | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी राजकीय नेत्यांनी प्रसारमाध्यमांसमोर चमकोगिरी न करता तपास यंत्रणेला मदत करावी, असा सल्ला विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिला आहे. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायद्या व्यवस्थेला धोका आहे, असे देखील उज्वल निकम यांनी सांगितले. ते सांगलीत बोलत होते.

 राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्या तपास यंत्रणा वर काही मतभेद व्यक्त केली जात आहेत.तपास यंत्रणानी तपास करताना संयम बाळगला पाहिजे. तर कोण्ही चमकुगिरी म्हणून वाट्टेल तशी निवेदन देणे किंवा सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जात आहेत.. राजकीय नेत्यांनी तपास यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले तर कायद्या व्यवस्थेला धोका आहे.. नेत्यांनी न्यायालयात दाद मागावी.. जनतेच्या मनात शंका निर्माण केली जात आहे.. हे योग्य नसल्याचे निकम म्हणाले आहेत.

मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने

 गुन्हा घडता कामा नये आणि लोकांना न्यायालयात जावेच लागू नये हे मुख्यमंत्र्याचे वक्तव्य स्तुत्य आहे.मुख्यमंत्र्याच्या आजच्या वक्तव्यावर विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडून कौतुक केले आहे.पण मनुष्य स्वभावाप्रमाणे आपल्या मनासारखे झाले नाही तर याची कुठे दाद मागायची हा देखील महत्वाचा घटक, न्यायालये असली पाहिजेत मात्र न्यायालयात अकारण कुणाला त्रास, बदला घेण्याच्या हेतूने कायदेशीर कारवाई नसावी हाच यामागे मुख्यमंत्र्याचा उदात्त हेतू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अहमदनगरचे पालकमंत्री पद सोडण्याबाबत हसन मुश्रीफ यांचा दुजोरा

अक्षय कुमार स्टारर OMG 2 चित्रपटाचे शूटिंग सुरु