in

Ashadhi Wari 2021 | संत मुक्ताई पालखीचं मुक्ताईनगरहून पंढरपूरकडे प्रस्थान

आज आषाढ शुद्ध दशमीला आषाढी वारी पालखी सोहळ्यातील माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका विशेष शिवशाही एसटी बसेस अनुक्रमे देहू आणि आळंदी वरून पंढरीकडे मार्गस्थ होतील. माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांसोबत 2 शिवशाही बसेसने 40 वारकरी असतील यात मानाच्या दिंडीवाल्यांमध्ये रथापुढील पहिल्या 9 आणि रथामागील पहिल्या 9 दिंडीतील वारकरी ,पुजारी ,चोपदार आणि मानकऱ्यांचा समावेश असेल.

पादुकांसोबत स्वतंत्र पोलीस बंदोबस्त असेल. माऊलींच्या पादुकांवर पहाटे पवमान पूजा अभिषेक झाल्यावरनंतर ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांच्या तर्फे नैवेद्य दाखवला जाईल. कीर्तन झाल्यावर आजोळघरातील पादुका पालखी सोहळा मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात दिल्या जातील आणि सकाळी 8.30 च्या सुमारास पादुका मार्गस्थ होतील.

वाखरीमध्ये संतभेट झाल्यावर पंढरीकडे अडीच किलोमीटर पायी वारीने पादुका निवडक वारकऱ्यांच्या सहभागात नेल्या जातील. मंगळवारी म्हणजे उद्या पहाटे 2 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा होईल. महापूजेवेळी मुख्यमंत्र्यांसह 50 लोकांनाच परवानगी असेल मंदिरातील विणेकरी दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी असून मानाचे वारकरी हे विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातील आहेत. विणेकरी केशव कोलते आणि इंदुबाई मानाचे वारकरी या दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत यंदाच्या महापूजेचा मान मिळणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘पावसामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं’

Petrol Diesel Price | सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थै!