in

हात-पाय बांधून तलवार दिली तर लढायचे कसे ? अशोक चव्हाणांचा सवाल

आरक्षणाची ५० टक्के मर्यादा कायम ठेवून राज्यांना आरक्षणाचे अधिकार दिल्याने मराठा आरक्षणाचा लढा कसा यशस्वी होईल? हात-पाय बांधायचे आणि तलवार देऊन लढ म्हणायचे यात काय अर्थ आहे? असा सवाल मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.

१०२ व्या घटनादुरुस्तीबाबतचे अधिकार राज्यांचेच आहेत, ही भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रभावीपणे मांडली. सोबतच ३० वर्षे जुन्या इंद्रा साहनी निवाड्यातील ५० टक्के आरक्षण मर्यादेचाही फेरविचार करण्यासाठी मराठा आरक्षणाचे प्रकरण ११ सदस्यीय घटनापिठाकडे वर्ग करण्याची विनंती देखील केली. देशातील इतर राज्यांनीही राज्य शासनाच्या या विनंतीला पोषक ठरेल, अशी भूमिका घेऊन आरक्षण मर्यादा वाढविण्याची मागणी केली.

५० टक्के आरक्षण मर्यादेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण टप्प्यावर असताना केंद्राने त्यावर चकार शब्दही काढला नाही. हा मुद्दा वरिष्ठ घटनापिठाकडे पाठवण्यासाठी केंद्राने अनुकूलता दाखवली असती किंवा तसा अर्ज केला असता तर कदाचित सकारात्मक परिणाम दिसून आला असता असेही अशोक चव्हाण म्हणाले.

इंद्रा साहनी निवाड्यातील ५०% आरक्षण मर्यादेचा फेरआढावा घेण्यात यावा, यासाठी महाराष्ट्राने सर्वतोपरी प्रयत्न केले. त्याला देशभरातील इतर राज्यांचीही मदत मिळाली. पण केंद्राकडे विनंती करूनही प्रतिसाद मिळाला नाही, हे दुर्दैव आहे. किमान आता तरी याबाबत केंद्राने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी देखील यावेळी ashok चव्हाण यांनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलासादायक ! राज्यात बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

”कोरोनाच दुसरं वर्ष पहिल्यापेक्षा अधिक भयानक”