in

Assembly Election 2021 | नंदीग्रामसह तमलुक, हल्दिया मतदारसंघात कलम १४४ लागू

बंगालमधील नंदीग्राम विधनासभा मतदार संघात आज होत असलेल्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या मतदार संघात तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तर भाजपाकडून सुवेंदु अधिकारी यांच्यात टक्कर होताना पाहायला मिळणार आहे. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नंदीग्रामसह तमलुक, हल्दिया या मतदारसंघात कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

आसाममध्ये दुसऱ्या टप्प्यात ७३ लाख ४४ हजार ६३१ मतदार नागरिक आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर बंगालमध्ये ७५ लाख ९४ हजार ५४९ मतदार मतदान करणार आहे. यंदा होत असलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये EVM मशीनसह वीवीपॅटचा वापर करण्याचा निर्णय निवडणुक आयोगाने दिला आहे. या टप्प्यात नंदीग्रामकडे सर्वांचे लक्ष लागून आहे, त्यामुळे राजकीय युद्धामध्ये मतुआ समाजाचे वर्चस्व असलेल्या या जागांवर टीएमसीचे वर्चस्व असले तरी यावेळी अधिकारी कुटुंबांत कांटे की टक्कर असल्याचे यला मिळत आहे. टीएमसीच्या जुन्या पक्षाच्या निष्ठावंतांशी असलेल्या टीएमसीच्या नाराजीचा सामना सुवेंदु अधिकारी यांना करावा लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्र सरकारने अशीच तत्परता दाखवत पेट्रोल, डिझेल, गॅसवरील दरवाढ मागे घ्यावी; सुप्रिया सुळेंचा टोला

संजय निरुपम यांचा सरकारला घरचा आहेर; लॉकडाऊनचा निर्णय चुकीचा