in ,

Assembly Election | निवडणूक आयोगाची आज सर्वपक्षीय बैठक

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूका सुरू असून निवडणूक प्रचार सभेत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जाताना दिसतेय. प्रचारसभेदरम्यान मोठ्या संख्येने गर्दी केली जात असल्याने कोरोनाचा संसर्ग फैलण्यास सुरूवात झाली आहे. या दरम्यान, पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी आरिज आफताब यांनी आज निवडणूक प्रचाराशी संबंधित विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. यावेळी आयोगाने सर्व राज्य आणि राष्ट्रीय राजकीय पक्षांना एकच प्रतिनिधी हजर राहण्याचे आवाहन केले आहे.

निवडणूक आयोगाच्या या बैठकीत पश्चिम बंगालमधील उर्वरित चार टप्प्यांसाठी निवडणूक प्रचाराशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली जाणार आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगसह कोरोना संबंधित इतर नियमांचे पालन यासंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक जगमोहन आणि राज्य आरोग्य सचिव एन.एस. निगम हे या बैठकीस उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने सर्व जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह आणि मतदान होणाऱ्या जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चेचे आयोजन केले. यावेळी मास्क घालणे, सामाजिक अंतर राखण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी जिल्हास्तरीय राजकीय नेत्यांशी चर्चा करण्यास सांगितले. तसेच मोठ्या संख्येने होणाऱ्या प्रचार सभा रोखण्याचे आदेश देखील दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हाफकिन संस्थादेखील कोवॅक्सीन बनवणार !

कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांचा शोध सुरू