in

बहुचर्चित असुर २ शुटींग सुरु…

प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या असुर २ वेब सिरीज चे शूटिंग सुरु झाले असून लवकरच सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमेय वाघ ने सेट वरचा फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली. २०२० मध्ये असुर ही वेब सिरीज वूट वर आली होती, रहस्यमय चित्त थरारक या सिरीज ने धुमाकूळ घातला होता,ही सिरीज प्रेक्षकांना खूप च आवडली होती, सिझन १ च्या तुफान यशानंतर दुसरया भागाची चर्चा सुरु होती. तसेच दुसऱ्या भागाबद्दल सांगण्यात ही आल होत. अखेर या सिरीजच्या शुटींगला सुरवात झाली आहे. अभिनेता अमेय वाघनं आपल्या instgram अकाउंटवरून क्यापबोर्ड सोबत एक फोटो शेअर करत या बद्दल ची माहिती दिली आहे

दिग्दर्शकांचा असा दावा आहे कि सिझन २ हा सिझन १ पेक्षा ही रोमांचक असेल, असुर २ मध्ये काही नवीन चेहरे ही दिसणार असून या कलाकारमध्ये अदिती कलकुंटे, रिदधी डोगरा, अनुप्रिया गोयनका शारीब हाश्मी यांचा ही समावेश आहे. सिझन १ सारख भाग २ मध्ये हि क्राईम थ्रिलर तसेच चांगल्या आणि वाईट प्रवृत्ती मधला रोमांचक सुवर्णमध्य साधणार आहे. या सिरीज चे शुटींग भारतातल्या खूप साऱ्या लोकेशंस वर चित्रित होणार आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रंकाळा तलाव ओव्हर फ्लो

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ७ हजार ७५६ रुग्ण कोरोनामुक्त