in

इस्त्रायलमध्ये बॉनफायर उत्सवात चेंगराचेंगरी, 30 जणांचा मृत्यू

कोरोनामुक्त झाल्यानंतर इस्त्रायल मध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आणि शुक्रवारी बॉनफायर या धार्मिक उत्सावाचं आयोजन करण्यात आलं. या उत्सवाच्या दरम्यान हजारोंची गर्दी जमली आणि या चेंगराचेगंरीत आतापर्यंत 30 नागरिकांना जीव गमवावा लागला तर हजारो नागरिक जखमी झाले आहेत.

माऊंट मेरॉन या ठिकाणी बॉनफायर उत्सव दरवर्षी भरवण्यात येतो. यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक जमा होतात. या दरम्यान नृत्याचा कार्यक्रम होतो. गेल्या वर्षी कोरोनामुळे हा उत्सव होऊ शकला नव्हता. त्यामुळे या वर्षीच्या उत्सवात भाग घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. हजारो लोक यासाठी उपस्थित राहिले. ही गर्दी आटोक्यात आणता आली नाही आणि त्याचं रुपांतर चेंगराचेंगरीत झालं. या चेंगराचेंगरीमुळे 30 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रायगडमध्ये 90 जणांवर रेमडेसिविरचे साईडइफेक्टस

Corona | पंतप्रधान मोदींनी बोलावली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक