मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) सचिन वाझे यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ठाणे न्यायालयात एटीएसने दावा केला आहे. सचिन वाझे यांचा मनसुख हिरेन यांच्या मृत्यूमध्ये हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्याआधारे तपास करताना एटीएसने काही पुरावे देखील दिले आहेत.
२५ फेब्रुवारीला उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली स्कॉर्पिओ कार आढळली होती. या कारचा मालक मनसुख हिरेन यांचा काही दिवसांनंतर ठाण्याच्या रेतीबंदर खाडीत मृतदेह सापडला. यानंतर संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा हात असल्याचे पुरावे राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळाले. तसेच एटीएसला मनसुख हिरेन यांच्या विरोधातील पुरावे गोळा करण्यात देखील यश मिळाले आहे. त्यानुसार सचिन वाझेंचा प्रथम दर्शनी या मृत्यूमध्ये सहभाग असल्याचा दावा एटीएसने केला आहे. त्यामुळे सचिन वाझेंची कस्टडी मिळवण्यासाठी एटीएसने ठाणे न्यायालयात मागणी केली होती. एटीएसने चार पानांच्या अहवालात यासंदर्भात खुलासा केला आहे.
या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. येत्या ३० मार्चला या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
Comments
Loading…