दिल्लीच्या सीमेवर केल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व करणारे राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर हल्ला झालाय. किसान सभेचे नेते राकेश टिकैत हे राजस्थानातील हरसौरा इथून एका सभेला संबोधित करुन बानसूरकडे निघाले होते. त्यावेळी काही लोकांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची माहिती टिकैत यांनी दिलीय. या हल्ल्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहे. तसंच टिकैत यांच्यावर शाईही फेकण्यात आली. या हल्ल्या प्रकरणी अलवरच्या मस्त्य विद्यापीठातील छात्रसंघाचे अध्यक्ष कुलदीप यादवसह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
पोलिसांनी संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. ‘राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात ततारपूर चौराहा, बानसूर रोडवर भाजपच्या गुंडांनी माझ्यावर जीवघेणा हल्ला केला. लोकशाहीच्या हल्ल्याचं चित्र’, असं ट्वीट करत हल्ल्याची माहिती स्वत: टिकैत यांनी दिली आहे. टिकैत यांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये हल्लेखोरांनी गाडीवर दगडफेक आणि गोळी चालवल्याचाही आरोप केलाय.
Comments
Loading…