in

संसदेत Sex… ऑस्ट्रेलियाच्या प्रेयर रुम्समधील अश्लील चाळ्यांचा व्हिडीओ व्हायरल!

सध्या ऑस्ट्रेलियात सत्ता असणाऱ्या कॉन्झर्व्हेटीव्ह सरकारमधील कर्मचाऱ्यांचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे पंतप्रधान मॉरिसन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संबंधित व्हिडीओमध्ये कर्मचारी संसद भवनामध्येच अश्लील चाळे करताना दिसत आहेत. या नव्या वादामुळे स्कॉट मॉरिसन यांचं सरकार पुन्हा एकदा नव्या वादात सापडलं आहे.

हा संपूर्ण प्रकार अपमानकारक आणि खूपच लज्जास्पद असल्याचं मत मॉरिसन यांनी व्यक्त केलं. एका व्हिसल ब्लोअरच्या माध्यमातून हे व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. सरकारमधील एका व्यक्तीने यासंबंधी डेटा फोडला. मात्र त्यापूर्वीच हे व्हिडिओ आणि फोटो सत्तेत असणाऱ्या सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रुप चॅटवर शेअर करण्यात आल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणासंदर्भात सर्वात आधी माहिती ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्र आणि चॅनल १० न्यूज फर्स्टने दिली होती.

संसद भवनामधील महिला खासदारांच्या केबीन्समध्ये हे कर्मचारी अश्लील चाळे करताना दिसत आहेत. हे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर माहिला खासदार आणि देशातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. हे सर्व प्रकरण समोर आणण्याऱ्या व्यक्तीचं नाव टॉम असं असल्याची माहिती समोर आलीय.

प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सरकारमधील कर्मचारी आणि खासदार अनेकदा संसदेमधील प्रार्थना घराचा चुकीच्या कामांसाठी वापर करायचे. तसेच संसद भवनामध्ये अनेकदा खासदारांसाठी देहव्यापार करणाऱ्यांनाही या ठिकाणी आणलं जायचं. प्रेयर रुम म्हणून संसदेमध्ये तयार करण्यात आलेल्या छोट्या खोल्यांमध्ये सरकारी कर्मचारी आणि खासदार अनेकदा सेक्सही करायचे असा दावा या व्यक्तीने केलाय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Phone Tapping : काँग्रेसला नक्की किती हिस्सा मिळतो? फडणवीस आक्रमक

भाजपाचा आयटी सेल दक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ट्विटर हॅण्डल सुस्तावलेले!