in

‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक रिलीज

‘डॉक्टर जी’मधील आयुष्मान खुरानाचा ‘फर्स्ट लुक’ समोर आला आहे . Doctor G जंगली पिक्चर्स प्रोडक्शनचा चित्रपट असून, त्यामध्ये आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), रकुल प्रीत सिंह आणि शेफाली शाह मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतीच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, निर्मात्यांनी आज आयुष्मानचा बहुप्रतीक्षित ‘फर्स्ट लुक’ सादर केला आहे.

ट्विटरवर फर्स्ट लूक शेअर करताना आयुष्मान खुराना याने लिहिले की, “डॉक्टर जी तयार आहेत. आता शूटिंग सुरु होईल.” आयुष्मान खुरानाच्या चाहत्यांना त्याचा नवीन अवतार खूप आवडला आहे. आयुष्मानच्या या फर्स्ट लूकमध्ये त्याच्या फॅन्सची नजर अधिक कोणत्या गोष्टीवर टिकली असेल तर ती आहे त्याच्या हातातलं पुस्तक. या पुस्तकावर लिहिलेले आहे, ‘स्त्री रोग चिकित्सा’ म्हणजेच आयुष्मान या चित्रपटात स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून दिसणार आहे, असा अंदाज चाहते वर्तवत आहेत.

बरेली की बर्फी आणि बधाई हो सारख्या दोन यशस्वी चित्रपटांनंतर ‘डॉक्टर जी’ हा जंगली पिक्चर्ससोबत आयुष्मानचा तिसरा चित्रपट आहे. आयुष्मान आणि रकुल पहिल्यांदाच ‘डॉक्टर जी’च्या निमित्ताने एकत्र येत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price Today | सोन्या-चांदीचा भाव घसरला

‘देवमाणुस’ मालिका वादाच्या भोवऱ्यात