in

Bank Holiday 2021: बँका राहणार ‘इतक्या’ दिवस बँका बंद, आताच करून घ्या बँकेची सर्व कामे

सरकारी बँका मार्चचा अंतिम आणि एप्रिलच्या पहिल्या आवठ्यांत आठ दिवस बंद राहणार आहेत. २७ मार्चपासून ते ३१ मार्च तसेच १, २ एप्रिल आणि ४ एप्रिलला बँका विविध कारणांसाठी बंद राहतील. आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांसाठी मार्च महिना महत्वाचा असतो. पण मार्चअखेरीस होळी, शनिवार, रविवार आणि बँकांच्या वर्षाचा आर्थिक हिशेब करण्यास बँका बंद राहणार आहेत.

यामध्ये २७ मार्चला दुसरा शनिवार, २८ मार्चला रविवार, २९ मार्चला धूलिवंदन सण, ३० मार्चला मार्च अखेरचा दिवस तर ३१ मार्चला सार्वजनिक व्यवहार बंद असल्याने बँका बंद राहणार आहेत. तर १ एप्रिलला अकाउंट क्लोजिंगचा दिवस, २ एप्रिल दिवशी गुड फ्रायड तर ४ एप्रिलला रविवार असल्याने सरकारी बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग कॅलेंडरनुसार २७ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान केवळ दोनच दिवस बँकांचे कामकाज राहणार आहे. त्यामुळे या दोन दिवसांमध्ये बँक सुरु असतानीही ग्राहकांची बँकेची महत्त्वाची कामे शिल्लक राहिल्यास ती करण्यासाठी ५ एप्रिलची वाट वी लागणार आहे.

सरकारी बँक कर्मचाऱ्यांनी बँकांच्या खाजगीकरणविरुद्ध पुकारलेल्या संपामुळे आधाची बँका १५ ते १६ मार्चला बंद होत्या. तर याआधी दुसरा शनिवार रविवारमुळेही बँकांना सुट्टी होती. यामुळे देशभरातील बँकांचे कोट्यावधींचे व्यवहार ठप्प झाले होते. याचा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. परंतु आता सलग सुट्ट्यांमुळे बँकांचे कामकाज पुन्हा ठप्प होणार आहेत. लवकरात तुमची काम पूर्ण करून घ्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

India vs England 1st odi ; भारताची ‘शिखर’ धावसंख्या; इंग्लंड समोर 318 धावांचे आव्हान

शरद पवार कोणाला मूर्ख बनवत आहेत ? याचे उत्तर द्यावे – रवीशंकर प्रसाद