in

Bappi Lahiri | कोरोनावर यशस्वी मात, बप्पी लहरींना मिळाला डिस्चार्ज!

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी आता कोरोनाच्या संसर्गामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. बप्पी लहरी यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून, ते आता घरी परतले आहेत. घरी परतल्यानंतर बप्पी लहरी यांनी प्रथम ब्रीच कँडी रुग्णालयाचे आभार मानले ज्यांनी त्यांना कोरोना विषाणू विरूद्धची लढाई जिंकण्यास मदत केली. बप्पी लहरी यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते खूप खुश दिसत आहे.

31 मार्च रोजी बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. त्यावेळी बप्पी लहरी यांच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बप्पी लहरी यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर बाप्पी लहरीच्या चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सुरुवात केली. तथापि, आता बप्पी रूग्णालयातून घरी परत आले आहेत, तेव्हा त्यांचे चाहते देखील याबद्दल आनंदी आहेत.

https://www.instagram.com/p/CNhlOVyg6yi/?utm_source=ig_web_copy_link

पाहा बप्पी लहरींची इन्स्टाग्राम पोस्ट

बप्पी लहरी यांनी लिहिले, ‘सर्वशक्तिमान आणि प्रियजनांच्या आशीर्वादाने मी परत घरी आलो आहे. ब्रीच कँडी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी वर्ग यांचे विशेष आभार. आपल्या प्रार्थना आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.’

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘मुंबईतील कोव्हिड सेंटर्सची संख्या वाढवली मात्र काळजी घेणं गरजेचं’

कोरोनामुळे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं निधन