in

दुप्पट परताव्याचा आशेने बार्शीकरांची 5 कोटीची फसवणूक, 5 आरोपींविरोधात गुन्हा

संजय पवार | सोलापूरमधील बार्शी येथे 28 टक्के परताव्याच्या आशेने सहा बार्शीकरांची 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. .या प्रकरणी 5 आरोपींविरोधात बार्शी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

सोलापूरच्या बार्शी शहरात आलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीने लोकांना आकर्षीत परताव्याचे अमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या आमिषाला बळी पडत आलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीमध्ये 6 लोकांनी जवळपास 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. या प्रकरणात पोलिसांनी विशाल अंबादास फटे , राधिका विशाल फटे , रामदास गणपती फटे , वैभव अंबादास फटे आणि अलका अंबादास फटे सर्वजण रा.उपळाई रोड बार्शी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भा.द. वि.कलम 420 , 409, 417 , 34 आणि महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय हितसंबंधांचे संरक्षण अधीनियम 1999 प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.

या प्रकरणी आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून संबंधित कंपनीना सील करण्यात आली असून त्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती अप्पर अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिलीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘भाकरीवर टाच आणणे योग्य नाही’;जितेंद्र आव्हाडांचा अभिनेते किरण मानेला पाठींबा

प्रियांका गांधींच्या ‘लडकी हूँ, लड सकती हूँ’ अभियानाला महाराष्ट्रातून बळ; जिल्हा कमिटीत महिला नियुक्तीचा आदेश