in

‘कोरोना विरुद्धची लढाई’; वैती कुटुंबीयांनी साकारला घरगुती गणपतीत देखावा

संदीप गायकवाड, विरार | गेल्या दोन वर्षापासून लढण्याचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग बनलेल्या ‘कोरोना विरुद्ध लढाई’चा देखावा विरारमध्ये एका घरगुती गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात आला आहे. हा देखावा पाहून गणेशभक्तांना नक्कीच आपल्या जबाबदारीची निश्चित जाणीव होणार आहे.

विरारच्या टेंभीपाडा येथील वैती कुटुंबीयांनी आपल्या घरगुती गणराया समोर ‘कोरोना विरुद्धची लढाई’ हा देखावा साकारला आहे. शैलेश आणि भगवान वैती या भावंडांच्या कुटुंबीयांनी हा देखावा साकारला आहे. मार्च 2020 पासून सर्व जग कोरोनाशी वेगवेगळ्या पातळीवर झुंज देत आहे. डॉक्टर, स्वच्छता दूत, पोलीस, आशा वर्कर या फ्रंटलाईन वर्करनी आपल्या जीवाची बाजी लावून देशवासियांचे प्राण वाचविण्याचे काम सूरू ठेवले आहे.

मात्र ही लढाई अजूनही संपलेली नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी सुद्धा आपली सामाजिक जबाबदारी स्वीकारून, मास्क घालावा, हात स्वच्छ धुवावेत, लसीकरण करून घ्यावे, ऑक्सिजनची वाढती कमतरता लक्षात घेऊन, झाडे लावावेत, असा या देखाव्यातून संदेश दिला आहे. सर्व देखावा हा सुंदर आणि मनमोहक साकारण्यात आला आहे. देखावा पाहणार्याना आपल्या जबाबदारीची निश्चित जाणीव होणार त्यामुळे प्रत्येकाने हा देखावा पहावा असे अहवान ही वैती कुटुंबाकडून केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ऑनलाईन फूड ऑर्डर महाग होणार , केंद्र सरकार जीएसटी लावण्याच्या तयारीत

खडू ,फळा, पाटी आणि पेन्सीलची बाप्पा समोर आरास