in

बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन

ओडिशा क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे मॅच रेफरी प्रशांत मोहापात्रा यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने बुधवारी ट्विटरवर या संदर्भातील माहिती दिली. दरम्यान या घटनेनंतर क्रिकेट वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

“प्रशांत मोहापात्रा यांनी बुधवारी सकाळी भुवनेश्वर येथे अखेरचा श्वास घेतला”, असे ट्वीट करत ओडिशा क्रिकेटने त्यांच्या दुःखद निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला.भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना आणि हरभजन सिंगनेही प्रशांत मोहापात्रा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

कारकीर्द

प्रशांत मोहापात्रा यांनी ४५ प्रथम श्रेणी सामन्यांत ३०.८४च्या सरासरीने २१९६ धावा केल्या. यात ५ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. ४० घरगुती सामन्यांमध्येही ते रेफरी होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mucormycosis;महाराष्ट्रासाठी पुढचे १० दिवस काळजीचे; आरोग्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

Maharashtra Corona: दिलासा!महाराष्ट्रात 51 हजार 457 रुग्ण कोरोनामुक्त