in

मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच – अजित पवार

आपण दररोज 15 ते 20 लाख लोकांना दररोज लस देऊ शकतो, एवढी आपली क्षमता आहे. पुणे जिल्ह्यातच 1.5 लाखांपर्यंत लसीकरण होऊ शकतं. पण, तेवढी लशींची उपलब्धता झाली पाहिजे. विदेशातील लसींनाही मर्यादा पडतात, केवळ दोन लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आनंदाची बाब ही आहे की लस घेण्यासाठी लोकं पुढाकार घेत आहेत, स्वत:हून पुढे येत आहेत. जे सुरुवातीच्या काळात लसीपासून दूर पळत होते, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

राज्यातील सर्वांनीच कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीची पूजा केली, तीही नियमांचं पालन करुनच केली आहे. कमीत कमी लोकांमध्ये कार्यक्रम पार पाडले पाहिजेत. लग्न किंवा इतर कार्यक्रमालाही किती लोकं असली पाहिजे, हे नियम ठरवले आहेत. या नियमाबाहेर असेल, तर ते मंत्री असू द्या किंवा सर्वसामान्य, सर्वांना नियम सारखेच, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. तसेच, पुढील 100 दिवस महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले.

ज्या नागरिकांनी लशींचे दोन्ही डोस घेतलेत, त्यांनी टप्प्याटप्प्याने बाहेर पडायला सुरुवात केली पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण, अनेकांचं मत वेगवेगळं आहे, वैज्ञकीय क्षेत्रातील मान्यवरही वेगळं मत मांडत आहेत. काही मान्यवर असं मत माडतात की, इथून पुढे 100 ते 120 दिवस अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या, 120 दिवसांत आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. लोकांनी नियमांचं तंतोलन पाल करायला हवं. मात्र, ग्रामीण भागात हे नियम पाळले जात नाहीत, मी नगर जिल्ह्यातील एका गावात गेलो होतो, तेथे मला नेहमीप्रमाणे वातावरण दिसलं, कुणीही मास्क घातला नव्हता, हे निष्काळजीपणा आहे, असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळतयं – संजय राऊत

“जितेंद्र आव्हाड आणि सर्वसामान्यांना वेगळा निर्णय का?”