in

साताऱ्यात बेंदूर सण साजरा

प्रशांत जगताप | साताऱ्याच्या जावळी तालुक्यात बेंदूर सणाच्या आदल्या दिवशीच बैलांची आकर्षक सजावट करून गावात मिरवणूक काढण्यात आली.

दुर्गम बामणोली विभागातील फुरुस गावामध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात येतो. उल्लेखनीय बाब म्हणजे फुरुस परिसरात बेंदूर सणाच्या आदल्या दिवशी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बारशी दिवशी बैलांची आकर्षक सजावट करण्यात आली. यानंतर तापोळा, फुरुस, मांटी, हातरे वाडी येथे पारंपरिक पद्धतीने आज बुधवारी संध्याकाळी बैलांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील ग्रामदैवताला बैलजोडी प्रदक्षिणा घालतात. यावेळी गोड धोड जेवणाचा बेत आखला गेला.

एकीकडे परंपरा लोप पावत चालली असताना देखील फुरुस गावाने आपली परंपरा जपत ग्रामीण संस्कृती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उंबरमाळी रेल्वे ट्रकवर साचले पाणी; रेल्वे सेवा विस्कळीत

जुन्या कसारा घाटात दरड कोसळली; महामार्गावरील वाहतूक विस्कळीत