in

डॉ. बंग यांनी निवडलेला मार्ग आदिवासी विकासाचा; राज्यपाल कोश्यारींकडून गौरवोद्गार

व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली | गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

राज्यपाल कोश्यारी यांनी आज गडचिरोली जिल्हयात पोहचल्यावर चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले. डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही  केली. तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

शोधग्राम भेटीनिमित्त उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना राज्यपालांनी डॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पातून विविध उपक्रमशील मनांना प्रेरणा मिळते अशी प्रतिक्रिया नोंदवली. दारूबंदी व तंबाखू बंदीचे काम कठीण आहे, ते सातत्त्याने केले पहिजे. या पार्श्वभूमीवर सर्च संस्थेद्वारा गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखू बंदीचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे, सिगारेट व बिडी पिण्याचे प्रमाण अनेक ठिकाणी कमी झाले आहे. उपदेश देणे सोपे आहे पण प्रत्यक्ष कार्य करणे कठीण आहे, ही खरोखरच एक साधना आहे. ती तुम्ही निष्ठेने करत आहात अशा शब्दात त्यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

T20 World Cup 2021| आयसीसीने जाहीर केला भारतीय संघ

Sameer Wankhade | एनसीबीच्या समीर वानखेडेंवर पाळत?