गतविजेता मुंबई इंडियन्स संघ यंदा जेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली MI चा संघ कसून सरावालाही लागला आहे. अशातच प्रसिद्ध आगरी गाणं ‘एक नारळ दिलाय दर्या देवाला’ यावर रोहित, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार व हार्दिक-कृणाल पांड्या बंधू थिरकताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा तुफान व्हायरल झाला आहे.
९ एप्रिलला मुंबई इंडियन्सचा सलामीचा सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) संघाशी होणार आहे. पण, तत्पूर्वी खेळाडूंनी फोटोशूट करून घेतलं आणि त्यावेळी ते आगरी गाण्यावर नाचताना दिसले.
यावर्षी मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, ट्रेंट बोल्ट, जयंत यादव, कीरोन पोलार्ड, क्रु णाल पंड्या, अनुकूल रॉय, इशान किशन, क्विंटन डी कॉक आदित्य तारे, धवल कुलकर्णी, जयंत यादव, क्रि स लिन, मोहसिन खान आणि अनमोलप्रीत सिंग, नॅथन कोल्टर नायर, अॅडम मिल्ने, पीयूष चावला, जिमी निशम, युधवीर चरक, मार्को जॅन्सेन, अर्जुन तेंडुलकर. या खेळाडूंचा समावेश आहे.
Comments
Loading…