in

भूमी पेडणेकर होणार ‘पत्रकार’

शाहरुख खानच्या रेड चिली एन्टरटेन्मेंटच्या प्रॉडक्‍शनखाली एक क्राईम थ्रिलरचे प्रॉडक्‍शन केले जाते आहे. त्याचे नाव ‘भक्षक’ असे असणार आहे आणि या सिनेमामध्ये भूमी पेडणेकर पत्रकार म्हणून दिसणार आहे.

बिहारमध्ये घडलेल्या गुन्ह्या कसा घडला त्याचा शोध ती कसा लावणार हे या सिनेमात दाखवणार आहेत. या ‘भक्षक’चे डायरेक्‍शन पुलकीत करणार असून पुलकीतने यापूर्वी राजकुमार रावच्या ‘बोस-डेड ओर अलाईव्ह’ या वेबसिरीजचे डायरेक्‍शन केले होते.

‘भक्षक’ची कथाही पुलकीतनेच लिहिली आहे तसेच सिनेमाचे शूटिंग जानेवारीपासून सुरू करण्याचे नियोजन केले असून ‘भक्षक’ची कथा 2018 मध्ये मुजफ्फरपूरमधील अनाथाश्रमात घडलेल्या लैंगिक शोषणाच्या सत्यकथेवर आधारलेली असणार आहे.

देशभर प्रचंड गाजावाजा झाल्यावर सीबीआयने या प्रकरणाचा तपास केला होता. दोन वर्षांनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रिजेश ठाकूरला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती.

या सिनेमात पत्रकार म्हणून अर्जुन कपूरला घेतले गेले होते आणि गेल्यावर्षी जानेवारीतच शूटिंगही सुरू होणार होते. नंतर करोनामुळे सिनेमा रखडला. अर्जुन कपूरच्या तारखा जुळल्या नाहीत. आता पत्रकार म्हणून अर्जुन कपूरच्या ऐवजी भूमी पेडणेकर दिसणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

२९ वर्षीय भारतीय क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

“हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे असायची पर्वणी आता मात्र सगळंच अळणी”