पिकू सिनेमातील मोठ्या पडद्यावरची दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांची बाप-लेकीची केमिस्ट्री अतिशय हिट ठरली. त्यानंतर ही जोडी पुन्हा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसली नाही. आता मात्र ही जोडी पुन्हा सज्ज झाली आहे. मोठ्या पडद्यावर एकत्र येण्यासाठी हॉलिवूडचा गाजलेला सिनेमा ‘द इन्टर्न’चा अधिकृत बॉलिवूड रिमेक गेल्या वर्षी जाहीर झाला होता. त्यामध्ये आता दीपिका पदुकोण आणि बिग बी अमिताभ बच्चन एकत्र झळकणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा करत सिनेमाचं एक नवीन पोस्टर नुकतच रिलीज देखील करण्यात आलं आहे.
2015 साली रिलीज झालेल्या ‘द इन्टर्न’ या सिनेमाचा रिमेक जाहीर झाल्यापासून रॉबर्ट डी नायरो आणि अॅन हॅथवे यांच्या भूमिकेत कोण दिसणार याची उत्सुकता होती. सिनेमात दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार हे अगदी सुरूवातीलाच जाहीर झालं. त्यानंतर रॉबर्ट यांच्या भूमिकेसाठी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांचं नाव जाहीर करण्यात आला. तर लॉकडाऊनमुळे सिनेमा रखडला. त्यात ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी आल्यामुळे सिनेमाचं प्री-प्रोडक्शन थांबल.
अखेर पुन्हा एकदा सिनेमाची चर्चा काही दिवसांपूर्वी ऐकायला मिळू लागली. त्यात बिग बी यांच्या नावाची चर्चा सुद्धा रंगत होती. ऋषी कपूर यांच्या जागी बिग बी एकदम फिट बसतील असं सुद्धा बोललं जात होतं मात्र त्याबद्दल अधिकृत असं काहीच जाहीर झालं नाह. तर या फक्त चर्चा आहेत असं वाटत असतानाच आता सिनेमाबद्दल एक गुड न्यूज आली. या फक्त चर्चा नव्हत्या असं सिद्ध झालं आणि सिनेमाची अधिकृत कास्ट जाहीर झाली. सिनेमाच्या नवीन पोस्टरवर ते झळकलं सुद्धा. सिनेमाचं दिग्दर्शन अमित रविंदरनाथ शर्मा यांचं असणार असून सिनेमाची निर्मिती सुनीर खेतरपाल आणि खुद्ध दीपिका पदुकोणची असणार आहे. सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये रिलीज होणार असल्याचं या नवीन पोस्टरमधून स्पष्ट करण्यात आलं आहे…
Comments
Loading…