in

‘या’ स्मार्टफोनवर मिळणार मोठा डिस्काउंट

साउथ कोरियाची कंपनी एलजीने नुकताच दोन स्क्रीनच्या स्मार्टफोन LG Wing लाँच केला होता. आता कंपनीने आपल्या स्मार्टफोनचा बिझनेस बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे.

LG Wingला तुम्ही ४० हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. कंपनी स्मार्टफोन बनवणे बंद करणार असली तरी या फोनसोबत ३ वर्षाचे अपडेट कंपनीकडून दिले जाणार आहे. तसेच आफ्टर सेल सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. फ्लिपकार्ट फ्लॅगशीप सेलमध्ये आज म्हणजेच १२ एप्रिल पासून सुरूवात होणार असून हा सेल १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. Flipkart Flagship Sale च्या दरम्यान LG Wing स्मार्टफोन ग्राहकांना फक्त २९ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो.

असे आहेत या फोनचे फिचर

  • या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 765G चिपसेट दिला आहे.
  • दोन डिस्प्ले दिले
  • या फोनमध्ये ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज
  • या फोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले
  • फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स
  • १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स
  • १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स
  • सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा
  • फोनला पॉवर देण्यासाठी ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोविड केअर सेंटरमध्ये स्वच्छतेचे तीन तेरा

2 दिवसांनी लॉकडाऊन लागणारच; व्यावहारिक भूमिका घ्या…