in

अडवून दाखवा.. उद्धव दादा मी शंभर टक्के एकादशीला जाणार

प्रशांत जगताप | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जर पूजेला जाणार तर मी देखील पूजेला जाणार. उद्धव दादा तुमच्या प्रशासनाला सांगा मला अडवून दाखवयाला असे आवाहनच बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी प्रशासनाला दिले आहे.

बंडातात्या कराडकर आणि वारकऱ्यांना वारीच्या रस्त्यावर पायी चालत जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा निषेध बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी केला असून आपण वारकऱ्यांच्या पाठीशी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पूजेला जाणार असतील तर मी देखील आषाढी एकादशी दिवशी पंढरपूरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

तसेच इलेक्शन,राजकीय सभा,मेळावे घेतले जातात तेव्हा कोरोना संसर्ग होत नाही का? असा सवाल उपस्थित करत अभिजित बिचुकले यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

हिंगोलीत बोगस मुन्नाभाई डॉक्टरचा पर्दाफाश

कला दिग्दर्शक राजू सापतेंच्या आत्महत्येची सखोल चौकशीची मागणी