in

बिग बॅास सिझन १५ चा प्रोमो लॉंच …

ईद च्या मुहूर्तावर सलमान खान ने बिग बॅास सिझन १५ चा प्रोमो लॉंच केला आहे, या प्रोमो मध्ये तो लोटपोट हसताना दिसतोय आणि हा सिझन इतका धमाकेदार असेल कि टीव्ही वर तो बॅन केला जाईल, अस हि तो म्हणतोय. या सिझन ची प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे.

सलमान खान ने प्रोमो लॉंच करतांना अस म्हंटल आहे कि, बिग बॅास सिझन १५ हा डिजिटल असणार असून, तो ऑक्टोबर महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज केला जाईल. या सिझनमध्ये प्रेक्षकांना खूप मनोरंजन पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना प्रथमच आता बिग बॅास मध्ये प्रत्यक्ष सहभाग घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ हि खेळायला मिळणार आहेत. जे कोणी प्रेक्षक स्पर्धक म्हणून सहभागी होतील
त्यांनी बिग बॅास च्या घरात चांगल्या पद्धतीने राहा, अशा सूचना सलमानने केल्या आहेत. बिग बास सिझन १५ हा इतका धमाकेदार असेल कि टीव्ही वर तो बॅन केला जाईल, असही त्याने म्हंटल आहे.
बिग बॅास सिझन १५ च्या भागात कोण कोण कंटेस्टेंट असतील त्यावर चर्चा चालू आहेत, आणि अंदाज वर्तवला जातोय कि दिशा वकांनी पासून रिया चक्रवर्ती पर्यंत सिझन १५ च्या भागात कदाचित दिसून येतील,

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिक्षकाच्या ‘अजिंठ्याच्या’ चित्राची जागतिक झेप; ‘टोर्सो इंडिया’चा पुरस्कार जाहीर

फडणवीसांच्या काळात DGIPR अधिकाऱ्यांचा इस्त्रायल दौरा; देवेंद्र यांची पहिली प्रतिक्रिया