in ,

भाजपालाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस; देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पाऊस आणि वादळ

परवाच्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पंढरपुरात भर पावसात सभा घेतल्याने पुन्हा चर्चेला उधाण आलं. काल पंढरपुरातही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत पावसाने हजेरी लावली. मात्र, पाऊस जोरदार पडला नाही. थेंब थेंब पाऊस पडला. त्यामुळे भाजपलाही पंढरपुरात फडणवीसांच्या सभेत जोरदार पावसाच्या चमत्काराची आस लागली आहे. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात सभा घेतली आणि संपूर्ण देशात या सभेची चर्चा झाली.

सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान औताडे यांच्यासाठी सहा सभा घेतल्या. कासेगाव, गाढेगाव आणि पंढरपुरात या सभा झाल्या. प्रत्येक सभेत ते विरोधकांवर बरसले. मात्र, पंढरपुरात सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. थेंब थेंब पावसाने हजेरी लावले. मात्र, वारं प्रचंड सुटलं होतं. वादळामुळे ढग पुढे सरकल्याने जोरदार पाऊस पडला नाही. मात्र, पावसाची रिमझिम सुरू असतानाही फडणवीस बोलत होते आणि पंढरपूरकरही सभेच्या ठिकाणी बसून होते. कुणीही चुळबुळ केली नाही. सर्वजण भाषण ऐकण्यात तल्लीन झाले होते.

मात्र, पाऊस जोरदार न झाल्याने भाजप नेत्यांचा चांगला हिरमोड झाला. रिमझिम पाऊस पडल्याने भाजपला पाऊस कॅश करता आला नाही. त्यामुळे पवारांसारखेच फडणवीसही भर पावसात सभा करणारे योद्धे आहेत, असं ठसवण्याचे भाजपचे मनसुभेही उधळले गेले. स्वत: खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनीही फडणवीस यांची सभा पावसात व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, फडणवीसांच्या सभेत म्हणावा तसा पाऊस न पडल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री लॉकडाउनबाबत आजच मोठा निर्णय घेतील – अस्लम शेख

भाजपला धक्का, गोव्याच्या सत्तेतील भागीदार पक्ष NDAमधून बाहेर