in

“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

आषाढी एकादशीनिमित्ती विठुरायाची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते भक्तीमय वातावरणात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री स्वतः गाडी चालवत पंढरपूरला गेले. स्वत: गाडी चालवत पंढरपूरला मुख्यमंत्र्याचे हे दुसरे वर्ष. यावरून आता भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

मुंबईपडणाऱ्या मुसळधार पावसामुळे चेंबूर येथे मोठी दुर्घटना घडली. यासह उपनगर आणि जवळच्या पालघर, रायगड जिल्ह्यांनाही पावसाने झोपडले. मुंबईत शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने ३३ नागरिकांचा बळी घेतला. बहुतेक नागरिकांचा मृत्यू दरड आणि भिंत कोसळून झाला, तर विविध दुर्घटनांमध्ये १२ नागरिक जखमी झाले. यारून भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

स्वतः ड्रायव्हिंग करत शनिवारी चेंबूरपर्यत गेले असते तर लोटांगण घातलं असतं, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच याआधी, मुंबईत २५ लोक पावसामुळे मेले तरी मुख्यमंत्री महोदय घर सोडायला तयार नाहीत, हात टेकले यांच्यासमोर.. असे ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन टीका केली होती.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Eknath Khdase; जावई गिरीश चौधरींच्या ईडी कोठडीत वाढ

NEET परीक्षेला माझा विरोध नाही, पण यामुळं गरीब विद्यार्थी मागे पडू नये – रोहित पवार