in ,

जळगावमध्ये भाजपच्या किल्ल्याला खिंडार… १० नगरसेवकांच्या हाती ‘शिवबंधन’

एकेकाळी भाजपाचा बालेकिल्ला असणाऱ्या जळगावातील १० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी भाजपाच्या नगरसेवकांनी शिवबंधन बांधले. यामध्ये सात विद्यमान तर तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात खरंतर एकनाथ खडसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष राहिला आहे. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेली महाविकास आघाडी आणि नंतर खडसे यांनी केलेला राष्ट्रवादी प्रवेश यामुळे या मतदारसंघातील समीकरणं बदलली आहेत. आता शिवसेनेनं मुक्ताईनगर नगरपालिकेतील भाजप नगरसेवकांना गळाला लावत पक्षाला आणखी बळकट केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चेन्नई एक्सप्रेसचे बँकॉक कनेक्शन… लोणावळ्यात १२०० सरडे, २०० कासवं जप्त

Ramdev Controversy | इंडियन मेडिकल असो. आणि योगगुरु रामदेव यांच्यात वाद पेटला