in

भाजपची जुमलेबाजी सुरुच; ‘तिचे’ घर स्वत:चे नव्हे तर भाड्याचे!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार शिगेला पोहोचला आहे. मतदानाचा पहिला टप्पा २७ मार्च रोजी पार पडणार आहे. एकूण ८ टप्प्यांमध्ये बंगालमध्ये मतदान पार पडणार आहे. भाजपकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. अशातच भाजपनं वर्तमानपत्रात दिलेली एक जाहिरात जुमला असल्याचं उघड झालं आहे.
२५ फेब्रुवारी रोजी कोलकाता येथील जवळपास सर्वच वर्तमानपत्रात पंतप्रधान आवास योजनेची जाहिरात छापून आली होती. या जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत एका महिलेचा फोटो छापण्यात आला आहे. या महिलेला पंतप्रधान आवास योजनेतून घर मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. बंगालमधील २४ लाख कुटुंब आत्मनिर्भर बनल्याचा दावा भाजपानं केला आहे. मात्र, हा दावा खोटा असून जाहिरातीमधील महिला वास्तवात भाड्याच्या घरात राहत असल्याचं आता उघड झालं आहे.

लक्ष्मीदेवी असं जाहिरातीमधील महिलेचं नाव आहे. गंगासागर येथील जत्रेत आम्ही काम करत होतो. आम्हाला या फोटोबाबत काहीच माहिती नाही. मला कुठलंही घर मिळालं नाही. आम्ही भाड्याच्या घरात राहतो. आम्ही सर्वजण नीट झोपू शकत नाही इतकं छोटं आमचं घर आहे, असं जाहिरातीत झळकलेल्या लक्ष्मीदेवी यांनी सांगितलं.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात टि्वट करून केंद्र आणि भाजपा सरकारवर टीका केली आहे. सातत्यानं सांगितल्यानंतरही खोटं ते खोटंच राहतं, असं त्यांनी म्हटलं आहे. ‘हॅशटॅग फॅक्टचेक’ असं म्हणत राहुल गांधींनी हा फोटो शेअर केला आहे.

भाजपाच्या जाहिरातीमधील शेतकरी हा आंदोलनात –

गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात पंजाबमधील शेतकरी हरप्रीतसिंग हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र, पंजाबमध्ये या कायद्यांवर भाजपच्या जाहिरातीत हरप्रीतसिंग यांचा फोटो झळकलेला आहे. या अर्थ भाजपच्या जाहिरातीवर ज्या शेतकऱ्याचा फोटो कृषी कायद्यांचा समर्थक म्हणून लावण्यात आला होता तो शेतकरी वास्तवात दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहे. दरम्यान, भाजपानं आपल्या फोटोचा बेकायदेशीररित्या वापर केला, असा आरोप हरप्रीतसिंग यांनी केला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत सेबीच्या अधिकाऱ्यांवर सीबीआयची छापेमारी

शरद पवार LIVE | आरोपांमध्ये तथ्य नाही, देशमुखांचा राजीनामा नाही